राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप चालबर्डी येथे संपन्न
निळकंठराव शिंदे महाविद्यालय तर्फे शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चालबर्डी (रै) येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण करून करण्यात आले. या शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, विशेष अतिथी प्राध्यापक डॉक्टर विशाल शिंदे, सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तसेच श्री गणेश नागपुरे उपसरपंच चालबर्डी श्री देवबाबा परशे पोलीस पाटील,डॉक्टर अपर्णा बी धोटे, व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ कुलदीप भोंगळे उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम सह अधिकारी प्रा. डॉक्टर अपर्णा धोटे यांनी आपल्या प्रस्ताविकेतून या सात दिवसीय शिबिराचे दिनचर्या व शिबिरा दरम्यान घेण्यात आलेले विविध उपक्रम व बौद्धिक कार्यक्रम यांची सखोल माहिती दिली.
याप्रसंगी या शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांमधून प्रथमेश वाढई याने आपले मनोगत व्यक्त केले.
श्री गणेश नागपुरे उपसरपंच चालबर्डी , यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रमाचा सल्ला दिला.
श्री देवबाबा परसोडे पोलीस पाटील चालबर्डी यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्याकरिता शुभेच्छा देत पुढील वर्षी सुद्धा चालबर्डी येथे येण्याचे निमंत्रण दिले.
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर विशाल शिंदे, सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासासोबतच चांगल्या सवयी, उत्तम आरोग्य, वाचन व खेळ याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामुळे लागलेल्या चांगल्या सवयी व निरोगी जीवन जगण्याचे तसेच युवा म्हणजे काय त्यामध्ये अमाप अशी शक्ती असते आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर केला तर जीवनामध्ये तो खूप मोठे स्थान गाठू शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील राहावे असे अध्यक्ष भाषणातून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ कुलदीप भोंगळे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप प्रधान यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे, प्रा संदीप प्रधान, प्रा. प्रतीक नन्नावरे,श्री परसराम आखात कर, यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजने चे सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



