घुग्घूस येथे श्री संत शिरोमणि गोरोबा काका महिला मंडळातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
घुग्घूस, चंद्रपुर : श्री संत शिरोमणि गोरोबा काका महिला मंडळ (घुग्घूस) यांच्या वतीने दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी श्री संत शिरोमणि गोरोबा काका सामाजिक सभागृह, घुग्घूस येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विशेष उपक्रम तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच परिसरातील ग्रामस्थांनीही वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून सामाजिक एकोपा आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री संत शिरोमणि गोरोबा काका महिला मंडळ, घुग्घूस यांनी केले.



