ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीक्षेत्र शेंडगावत श्री संत गाडगे महाराजांच्या जन्मगावी भव्य स्मारक उभे राहणार… विदर्भ रत्न हभप. श्री संजय महाराज पाचपोर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

श्री संत गाडगे महाराज यांच्या जन्मगावी बाबांचं भव्य दिव्य स्मारक भुमीपुजन समारंभ मोठ्या उत्साहात हरीपाठ टाळ मृदुंग नामं घोशात विदर्भरत्न गोसेवक हभप श्री संजय महाराज पाचपोर, पद्मश्री श्री जनार्दन महाराज बोथे,हभप वासुदेव महाराज महल्ले, हभप अविनाश वानखेडे महाराज मोर्शी, सागर महाराज परिहार, अतुल बोर्डे महाराज, ज्ञानेश्वर महाराज तिडके, श्याम महाराज निचीत, धनेश महाराज ढोके, गजानन महाराज चर्हाटे , विदर्भ वैभव मंदिर मुंबई संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक बारब्दे, सरचिटणीस गजानन नागे, यांचे शुभहस्ते श्री फळ वाढवुन, कुंदळ मारून गाडगे महाराजांच्या गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गजरात भुमिपुजन सोहळा पार पडला, यावेळी स्थानिक आमदार श्री गजानन लवटे, आमदार श्री हरिभाऊ पिंपळे, आमदार श्री प्रवीण तायडे, मा मंत्री जगदीश गृप्ता, मा.आमदार रमेश बुंदेले, व विदर्भ समाज संघ मुंबई चे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम भुयार, संजय बारब्दे, विजय खोत, प्रमोद तळोकार, संजय जायभाये, राजन जिचकार, अविनाश गावंडे, राजाभाऊ चौधरी विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज संघ मुंबई चे पदाधिकारी उपस्थित होते,श्री गाडगे महाराज धर्मशाळा मुंबई चे प्रशांत देशमुख, एकनाथ ठाकूर, स्थानिक मंडळी श्रीकृष्ण सावरकर, प्रभाकर ठाकरे, सुशिल गावंडे,सुनील खराटे, रामेश्वर अभ्यंकर, विजय विल्लेकर, सुरेखा ठाकरे, सुभाष बोडे, एंड. सदानंद जाधव,श्रीकांत जायले, रामुशेठ मालपाणी, डॉ गिरीश इंगळे, हरिनारायण जानोरकर ,गिरीधर बोरखेडे, असंख्य सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आयोजन स्मारक समितीचे वतीने श्रीधर नाईक यांनी केले श्रीधर नाईक यांनी स्मारकासाठी पाच एकर जमीन दान देऊन ५५ लाख रुपये वर्गणी जाहीर केली मुंबईतील विदर्भ वैभव मंदिर व विदर्भ समाज संघ मुंबई पदाधिकार्यांनी पाच कोटी रुपये वर्गणी गोळा करून देऊ तसेत विदर्भ वैभव मंदिर मुंबई संस्थेच्या वतीने ११ लाख रुपये वर्गणी स्मारका साठी देण्यात आली, उपस्थित अनेक मान्यवरांनी देणगी जाहीर करण्यात आली.

आमदार श्री हरिभाऊ पिंपळे पाच लाख रुपये, वर्गणी जाहीर केली, स्मारकाचा आराखडा तयार करून काळ्या दगडावर नक्षीकाम करून भव्य दिव्य सेवा शक्ती पिठ स्मारक, व बाबांचा दशसुत्री संदेश साकारण्यात येणार असे हभप श्री संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले, स्मारक उभारण्याचा प्रस्तावित खर्च २५ कोटी रुपये असल्याचे आर्किटेक्ट श्री संदीप पेठे, पुणे यांनी सांगितले, गावागावांत जाऊन लोक वर्गणीतून स्मारक उभे राहिल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला,व निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा स्मारक समिती धर्मादाय संस्था, संस्थेच्या वतीने करण्यात आले यावेळी मिरवणूक काढून अनेक मान्यवर उपस्थितीत भुमि पूजन पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रणजित गणोदे प्रास्ताविक श्री राजेंद्र गायगोले, स्थानिक मंडळी हभप पवन महाराज चराटे यांनी आभार मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीधर नाईक, प्रविण मलिये, अनंत गावंडे, विनोद बिजवे, सुरेश चर्हाटे महाराज, इतर सर्व स्मारक समिती कार्यकर्त्यांनी परीक्षण घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये