ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यस्तरीय शिक्षक वक्तृत्व स्पर्धेसाठी गुरुदास कामडी यांची निवड

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०"- 'राष्ट्रासमोरील आव्हाने आणि संधी' या विषयावर आपली भूमिका मांडणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षक – अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा’ विभाग व राज्यस्तरावर करण्यात आले होते ,या अनुषंगाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गुरुदास कामडी यांनी,”राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०”— ‘राष्ट्रासमोरील आव्हाने आणि संधी’ या विषयाचे मांडणी केलेली होती. बल्लारपूर तालुक्यातून सन्मित्र सैनिक विद्यालय चंद्रपूर येथील सहाय्यक शिक्षक गुरदास मंगरुजी कामडी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

      विभाग स्तरीय वक्तृत्व स्पर्धा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०”— ‘राष्ट्रासमोरील आव्हाने आणि संधी’ या विषयाची भूमिका प्रतिपादित केलेली होती.गुरुदास कामडी यांची नागपूर विभागातून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

      राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर, नवी मुंबई या ठिकाणी संपन्न होत आहे.

या वक्तृत्व स्पर्धेसाठी, नागपूर विभागातून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झालेले चंद्रपूर जिल्ह्यातील,बल्लारपूर तालुक्यातील सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक,तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्यवस्थापन परिषद- अधिसभा (सिनेट) सदस्य गुरुदास मंगरुजी कामडी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०”— ‘राष्ट्रासमोरील आव्हाने आणि संधी’ या विषयावर आपली भूमिका मांडणार आहेत.

     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक व अधिकारी कर्मचारी विविध स्पर्धांमध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून सन्मित्र सैनिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्यवस्थापन परिषद- अधिसभा ( सिनेट) सदस्य गुरुदास कामडी यांचे जिल्हा, विभाग स्तरावरून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मश राजेश पाताळे जिल्हा शिक्षणाधिकारी माध्य.प्राचार्य विनय मत्ते, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपूर,सचिनकुमार माळवी गट शिक्षणाधिकारी बल्लारपूर, केंद्रप्रमुख श्री नागेंद्र कुमरे सर, सन्मित्र सैनिक विद्यालयाच्या प्राचार्य कुमारी अरुंधतीताई कावडकर,विषयतज्ञ संगिता कामडी,सहकारी शिक्षक आदींनी गुरुदास कामडी यांचे अभिनंदन केलेले आहे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये