ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवाव्रती स्वर्गीय जगन्नाथजी गावंडे यांचा सहावा स्मृतिदिन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे अधरयू स्वर्गीय जगन्नाथजी गावंडे दादा यांच्या सहाव्या स्मृतिदिन दिनांक.१९रोज सोमवारी नगर स्वच्छता अभियान मिरवणूक, सामुदायिक प्रार्थना, व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने श्री गुरुदेव हनुमान मंदिर देवस्थान सुरक्षा नगर येथे संपन्न झाला.

स्मृतिदिन कार्यक्रमाची सुरुवात सुरक्षा नगर परिसरात नगर स्वच्छता अभियान राबवून झाली त्यानंतर येथील रामधून मार्गाने भजनी दिंडी सह स्वर्गीय जगन्नाथजी गावंडे दादा यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये प्रत्येक घरासमोर स्वच्छता करून रांगोळ्या काढून थोर संत,महापुरुषांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.

याप्रसंगी भ.प.मनोज महाराज चौबे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर स्वर्गीय जगन्नाथ जी गावंडे यांच्या जीवन कार्यावर प्रवीणआडेकर यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत गुंडावार,मधुकर बांदुरकर,उद्धवराव कुचनकर, पुरुषोत्तम मते, गोपाल ठेंगणे,शेखरजी घुमे, मुरलीधर मेश्राम,बालाजी नागपुरे, नथ्थुजी रासेकर, शोभाताई खडसे, सुवर्णाताई पिंपळकर, शालिक दानव ,श्रीहरी राऊत,बाबाराव नागोसे , गुणवंत कुत्तरमारे उपस्थित होते. प्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपनगराध्यक्ष सुधीर सातपुते, सुरक्षा नगर येथील नगरसेवक देवेंद्र गडपाले व रेखाताई कुटेमाटे यांचा सन्मान करण्यात आला. तद्वतच गवराळा येथील कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती च्या सदस्यांचा स्वच्छतेच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन विशाल गावंडे तर आभार गजानन डंभारे यांनी मानले. विश्वकर्मा महिला भजन मंडळ हनुमान नगर यांचे भजनी दिंडी साठी सहकार्य लाभले.कार्यक्रम प्रसंगी शेकडो गुरुदेव भक्त उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये