ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रियदर्शिनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनी संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग संचालनालयाच्या पत्रान्वये दि.१७ जानेवारीला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती यांच्या मार्फत प्रियदर्शिनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथे विभागीय तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

या तंत्रप्रदर्शनीत तालुक्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थींनी आपापल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. व्ही. बालसराफ हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या प्रणाली डहाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चिल्लरवार सर, वराडे सर, पुनवटकर मॅडम, नगराळे सर,दाते सर, आसेकर सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी डहाटे मॅडम यांनी आपल्या भाषणात तंत्रप्रदर्शनीचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच इतर क्षेत्रांतही आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले.

तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनी सकाळी १० वाजता सुरू झाली.

तांत्रिक विभागात श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रियदर्शिनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील प्रशिक्षणार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले.

अतांत्रिक विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तिन्ही क्रमांक पटकावले.

कार्यक्रमाचे संचालन स्वेताली वाकुलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे निदेशक एन. ई. सय्यद सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व निदेशक, शिक्षक व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये