विद्यार्थ्यांसाठी नियमित बस सुरू करा
भापकचे विनोद झोडगे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
मुडझा- हळदा- आवळगाव ता.ब्रम्हपुरी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणाकरिता ब्रम्हपुरी येथे येतात,त्यामध्ये कामगार शेतकरी शेतमजूर यांचीच मुले असून घरच्या आर्थिक कारणामुळे त्या विद्यार्थ्यांना किरायाने खोली करणे शक्य होत नसल्याने सर्व विद्यार्थी बस द्वारे ये जा करतात मुडझा वरून 9:30 वाजता ब्रम्हपुरी कडे बस आहे मात्र ही बस सर्व प्रवाश्यासाठी असल्याने सदरच्या बस मधे प्रमाणाच्या बाहेर प्रवासी व विद्यार्थी यांची गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना बस मधे प्रवास करणे शक्य होत नाही.कधी कधी विद्यार्थ्यांचे 1/2 पिरियड जातात तसेच ब्रम्हपुरी वरून 5 वाजता सुटणारी बस अश्याच प्रकारची असल्याने बस मधे अत्यंत गर्दीचा सामना करावा लागतो.
तेव्हा विद्यार्थ्यांसाठी मुडझा ते ब्रम्हपुरी व ब्रम्हपुरी ते मुडझा ही बस फक्त विद्यार्थ्यांकरिता सुरू करा या मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम.विनोद झोडगे यांनी आगर व्यवस्थापक ST महामंडळ ब्रम्हपुरी यांना दिला आहे. येत्या 7 दिवसात बस सुरू न झाल्यास विद्यार्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी विनोद झोडगे यांनी दिला आहे.
निवेदन देताना – मिलिंद भन्नारे,मोहिनी मेश्राम,राधा घोडमारे, श्रेया लाडसे, समीक्षा मस्के,ट्विंकल भोयर,गायत्री उकरे,खुशाली ठाकरे,घनेश्वरी उकरे,प्रतिक्षा लोळे. यासह आदी विद्यार्थी उपस्थित होते.



