ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा क्रीडा क्षेत्रात सुवर्णक्षण

वरोऱ्याचे व्हॉलीबॉल खेळाडू महाराष्ट्र राज्य संघात

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.

राजेंद्र मर्दाने, वरोरा.

*वरोरा* : लोकशिक्षण संस्था, वरोडा व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन (WSF) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या वरोऱ्यातील विविध खेळाडूंची महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. वरोरा क्रीडा क्षेत्रासाठी हा सुवर्णक्षण असून या ऐतिहासिक कामगिरीमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पुरुष गटातून शाश्वत शंकर धारणकर, तर महिला गटातून राशी दिनेशचंद्र मांडवकर यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, तब्बल २५ वर्षांनंतर महिला वरिष्ठ गटात वरोऱ्यातून राशी मांडवकर हिची निवड झाल्याने हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूलची खेळाडू समृद्धी मनोज पिंगे हिची कडप्पा (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. तसेच लोकमान्य कन्या विद्यालयाची खेळाडू उर्वी रवींद्र दसरे हिची बरेली (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.

गादरवारा (मध्य प्रदेश) येथे झालेल्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडू सृष्टी मोहन चाटे व आयुषी संजय कुबडे यांची मुलींच्या गटातून, तर वेदांत दीपक गोरकार याची मुलांच्या गटातून महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

या सर्व खेळाडूंचे अभिनंदन लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ऍड. दुष्यंत देशपांडे तसेच वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांनी केले.

वरोरा शहरात सर्वत्र या यशाबद्दल कौतुक होत असून खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, प्राचार्य राहुल राखे, मुख्याध्यापक संजय आंबुलकर, मुख्याध्यापिका स्मिता धोपटे, अनिल घुबडे, गणेश मुसळे, दुष्यंत लांडगे, ईश्वर डाबेराव, देवानंद डुकरे, तालुका क्रीडा अधिकारी निखिल बोबडे तसेच वरिष्ठ खेळाडूंना दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये