ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोनुर्ली येथे राज्य क्रीडा दिन साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांची जयंती व राज्य क्रीडा दिवस महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे साजरा कारण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध् यापक श्री बि. बि. भोयर यांनी खाशाबा जाधव यांच्या बद्दल क्रीडाक्षेत्रातील माहिती मुलांना दिली. तसेच प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी यावर्षी विभागीय स्तरावर आट्या पाट्या संघ उपविजेता ठरला. त्या खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शाळेचे संपूर्ण शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.



