ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

15 वर्षाचा मुलांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

याप्रमाणे आहे की यातील अल्पवयीन मुलगा दिनांक 08.05.2025 रोजी दुपारी १२.०० वा. दरम्यान घरी जेवण करून कोणाला काही न सांगता घराबाहेर निघुन गेला. तो सायंकाळ पर्यंत घरी परत आला नाही म्हणुन त्याचा गावात व त्याचे मित्राकडे तसेच नातेवाईका कडे शोध घेतला असता मिळुन आला नाही त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने आमीष दाखवुन फुस लावुन पळवुन नेले आहे. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पो.स्टे आर्वी येथे सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. अल्पवयीन मुलांचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तथा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्फतीने करीत असताना मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल (भा. पो. से.) पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शक करून पथक तयार करण्यात आले. गुन्ह्यात खात्रीशीर मुखबिर लावून व तांत्रिक तपास करण्यात आला. यातील अल्पवयीन मुलचा शोध अत्यंत शिताफीने अमरावती येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपीस रीतसर कायद्याप्रमाणे अल्पवयीन मुलास त्याचे वडिलांचे ताब्यात देण्यात आले.

  सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल (भा. पो. से.) यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, पो.हवा. दिवाकर परिमल, संजय राठोड, नितेश मेश्राम, पो.शि. नवनाथ मुंडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तसेच सायबर सेल येथील दिनेश बोथकर अक्षय राऊत गोविंद मुंडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये