ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऐतिहासिक बुद्धभूमी येथे नामविस्तार दिन संपन्न

नामांतर लढ्यातील शहीदांना आदरांजली _ डॉ. रंजन बदरे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे १४ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ऐतिहासिक बुद्धभूमी येथे भीमराव बहुउद्येशीय संस्था आवारपूर तसेच आई रमाई आंबेडकर महीला मंडळाच्या वतिने नामविस्तार वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 ऐतिहासिक बुद्धभूमी येथील आदरणीय भंते कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोककुमार उमरे, गौतमनगरी चौफेरचे संपादक गौतम धोटे, शेतकरी संघटनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पटकोटवार, डॉ. रंजन बदरे, रमेश खाडे, प्रमोद चांदेकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामांतराच्या लढ्यात लढलेल्या तमाम शूर वीर लढवय्ये भीमसैनिक, शहीद झालेल्या पोचीराम कांबळे, प्रतिभा तायडे, शरद पाटोळे, जनार्दन मेवाडे, सुहासिनी बनसोडे, दिलीप रामटेके, गौतम वाघमारे, चंदर कांबळे, अविनाश डोंबरे, गोविंदराव भुरेवाड, नारायण गायकवाड, रोशन बोरकर इत्यादी ज्ञात- अज्ञात शहीदांना आदरांजली वाहून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

तद्नंतर आवाळपूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि सध्या नांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉ रंजन नामदेवराव बदरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नामविस्तार वर्धापनदिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर रंजन बदरे यांच्या सत्कार कार्यक्रमानिमित्त गौरवपर विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चांदेकर प्रास्ताविक संपादक गौतम धोटे आणि आभारप्रदर्शन दर्शन बदरे यांनी केले.

कार्यक्रमानंतर आई रमाई आंबेडकर महिला मंडळ आवाळपूरच्या वतीने मसाला भात भोजनदानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपादक गौतम धोटे यांनी आलेल्या मंडळींसमवेत ऐतिहासिक बुद्धभूमी येथील बुद्धविहारांना भेट देऊन उपस्थितांना माहिती दिली.

कार्यक्रमाला ऐतिहासिक बुध्दभुमीचे भंते काश्यप, अशोककुमार उमरे, संतोष पटकोटवार,प्रमोद चांदेकर,रमेश खाडे, गौतम धोटे, डॉ रंजन बदरे, किशोर डोंगरे, रत्नाकर माथुलकर, राखुंडे, माजी ग्रामपंचायत सदस्या शीलाबाई धोटे, पुष्पाबाई बदरे,चेतनाबाई  खाडे,शुद्धलेखा खाडे, यशोधरा चांदेकर,शितल ठमके, कल्याणी वानखेडे, सविता नारनवरे, धम्माबाई जीवने,सविता बदरे,गिरजाबाई चांदेकर,स्मिता बदरे,चैताली वानखेडे,सोनी सातपुते,श्नेया धोटे,आदी महिला विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये