मोरेश्वर आस्वले यांनी लखमापूरमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करून केला वाढदिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
लखमापूर गावचे माजी उपसरपंच व युवा उद्योजक मोरेश्वर भाऊ आस्वले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आस्वले पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळाल्या तरच ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावेल.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनीही या सामाजिक कार्याचे स्वागत केले.



