भारी परिसरात अवैध रेतीची चढ्या दराने विक्री
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील भारी हा परिसर तेलंगणा सीमेला लागून असल्याने सध्या भारी हे रेती तस्करीचे केंद्र बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेलंगणाच्या भागातील नद्यांच्या पात्रातून अवैध उपसा करून ती रेती सीमा ओलांडून महाराष्ट्रात आणली जाते, आणि बारा हजार व दुप्पट ते तिप्पट भावाने विक्री केला जात आहे. भारी, शेडवाही, बाबापूर परिसरातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणि डंपरद्वारे रेतीची वाहतूक केली जाते.
मुख्य रस्ते टाळून नदीनल्याने किंवा शेतातील रस्त्यांनी ही रेती तेलंगणातुन महाराष्ट्राच्या सीमेत पोहोचवली जाते, जेणेकरून पोलीस किंवा महसूल विभागाची नजर चुकवता येईल. स्थानिक नागरिकांना घरासाठी रेती हवी असल्यास ती उपलब्ध होत नाही किंवा अत्यंत चढ्या दराने विकली जाते त्यामुळे सर्वासामन्या नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अनेक पटीने जास्त पैसे या भागात माफियांकडून उकळले जात असल्याच्या स्थानिक सरपंच, गावाकऱ्यांकडून बोलल्या जात आहे.
प्रशासनाकडून उपाययोजना करणे गरजेचे आहे. वनविभागकडून चालू असलेला शेडवाही (भारी )चेकपोस्ट ऐवजी बाबापूर च्या सीमेवर चालू करण्यात यावा आणि तेलंगणा सीमेवर कायमस्वरूपी चेकपोस्ट या मार्गावर २४ तास निगराणी ठेवण्यासाठी पोलीस किंवा महसूल व वनविभाग चौकीची आवश्यकता आहे. आणि महसूल विभागाची गस्त जिवती तहसीलदार आणि तलाठी स्तरावर या भागात अचानक धाडी टाकणे आवश्यक आहे.
लक्ष्मीकांत कोटनाके,सरपंच भारी



