जिवती तालुक्यातील शेतकरी ‘फार्मर आयडी’च्या प्रतीक्षेत
सरकारी योजनांच्या लाभापासून शेकडो शेतकरी वंचित ; ७/१२ संगणकीकरणाचा खोळंबा; जिवती तालुक्यातील शेतकरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
‘फार्मर आयडी’ अभावी मदतीपासून वंचित
जिवती :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, जिवती तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडे अद्याप हा आयडी उपलब्ध नसल्याने ते शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांपासून वंचित राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना जिवती तालुक्यातील शेतकरी मात्र आजही जुन्या महसुली नोंदींच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील ७/१२ चे संगणकीकरण पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ तयार होऊ शकत नाहीत.
परिणामी, राज्य आणि केंद्र सरकारच्या शेकडो कृषी योजनांचा लाभ घेण्यापासून तालुक्यातील शेतकरी वंचित राहत आहेत. पोर्टलवर ७/१२ ची माहिती न मिळाल्यास फार्मर आयडी तयार होत नाही.त्यामुळे शासकीय योजनांना मुकावे लागत आहे, ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि पिक विमा, पी. एम. किसान यांसारख्या योजनांचे अर्ज पोर्टल स्वीकारत नाहीत.काही योजनेंना सध्या सूट दिल्या असला तरी अडचण दूर झाले नाहीत. शासकीय नियमांनुसार, कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला ‘महाडीबीटी’ पोर्टलवर नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी शेतकऱ्याचा ७/१२ ऑनलाईन असणे आणि त्यावर त्याचा आधार क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे.
मात्र, जिवती तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात असल्याने आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे अनेक ७/१२ उतारे अद्याप संगणकीकृत झालेले नाहीत. शासनाने कृषी योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि थेट लाभ हस्तांतरण (डिबिटी) प्रक्रियेसाठी प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र ‘फार्मर आयडी’ देण्याची मोहीम हाती घेतली आहे. ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाइपलाइन आणि बियाणे-खते यांवरील अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना हा आयडी आवश्यक असतो. मात्र, जिवती तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण पोर्टलवर नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक त्रुटी.विद्युत व इंटरनेटचा अभाव: डोंगराळ भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे नोंदणी
प्रक्रियेत अडथळे :- माहितीचा अभाव,अनेक अल्पशिक्षित शेतकऱ्यांना या नवीन नियमाची आणि प्रक्रियेची पुरेशी माहिती नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सध्या रब्बी हंगाम जोमात असून अनेक शेतकऱ्यांना कृषी अवजारांची आणि सिंचन साहित्याची गरज आहे. परंतु, फार्मर आयडी नसल्यामुळे त्यांचे अर्ज प्रणाली स्वीकारत नाहीत.
परिणामी, हक्काचे अनुदान मिळत नसल्याने सामान्य जिवती तालुक्यातील शेतकरी ‘फार्मर आयडी’अभावी मदतीपासून वंचित राहत आहे. प्रशासकीय उदासीनतेचा फटका एकीकडे कृषी विभाग फार्मर आयडीची मागणी करतो, तर दुसरीकडे महसूल विभागाकडून ७/१२ च्या नोंदी ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचा मुद्दा जर लवकरच हे तांत्रिक अडथळे दूर झाले नाहीत, तर आगामी खरीप आणि रब्बी हंगामातील अनुदानापासून जिवती तालुक्यातील हजारो शेतकरी कायमचे वंचित राहण्याची भीती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा -2 (POCRA)अंतर्गत आमचे गावात आहेत. परंतु फार्मर आयडी तयार होत नसल्याने भरपूर शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे. काही शेतकऱ्यांचे जमिनी त्यांचे नावावर आहेत, पण कागदावर त्या ऑनलाईन दिसत नाहीत. यामुळे आम्हाला सरकारी मदत मिळत नाही. प्रशासनाने ७/१२ चे संगणकीकरणचे काम जलदगतीने करावे आणि आम्हाला फार्मर आयडी मिळवून द्यावा,” अशी मागणी संपूर्ण जिवती तालुक्यातील संतप्त शेतकरी करत आहे.
– सिताराम मडावी शेतकरी -पाटण



