ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत चोखामेळा यांच्या जन्म स्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही _ आमदार मनोज कायंदे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा येथील थोर संत चोखामेळा महाराज यांचा ७५८ वा जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसेच थोर संतांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार मनोज कायंदे यांनी केले.

सकाळी पालखी सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार कायंदे म्हणाले की, मेहुणा राजा हे संतपीठांपैकी एक महत्त्वाचे स्थान असून संत चोखामेळा महाराज यांचे जन्मस्थळ म्हणून या गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या या स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

यावेळी दुपारी आयोजित कार्यक्रमात माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, थोर संत व महापुरुषांच्या स्थळांच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी संत चोखामेळा जन्मोत्सव हा भविष्यात लोकोत्सव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सावित्रीबाई जिजाऊ यांचा सामाजिक क्रांतीला विरोध आणि विद्रोही संत चोखामेळांच्या विचारांना विरोध करणारे हे मनुवादाचे अनुयायी होते, चोखोबांनी सर्व संतांना बोलता लिहता केले आणि वारकरी संप्रदायांने खऱ्या अर्थाने बहुजनांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिल्याचे प्रतिपादन चोखामेळा जन्मोत्सवाचे प्रवर्तक तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मेहुणा राजा ह्या चोखामेळा जन्मस्थळ येथे केले.

आपल्या काळात उपेक्षित असलेले मात्र समाज व्यवस्थेविरुद्ध विद्रोह पुकारणारे संत चोखामेळा यांचा ७५८ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. पहाटे मातृतीर्थ मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, यांच्या हस्ते चोखामेळांच्या मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी जि. प चे शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, खडकपूर्णाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी. टी शिपणे, गटविकास अधिकारी मुकेश माहोर गटशिक्षणाधिकारी दादासाहेब मुसदवाले, सत्यशोधक शिक्षक सभेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. श्याम मुडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन कुमठे, युवासेना नेते श्रीनिवास खेडेकर, मेहुना राजा सरपंच मंदाताई बोंद्रे यांची उपस्थिती होती. महा आरती नंतर टाळ मृदंग आणि भजन कीर्तनाच्या निनादात पालखी गाव प्रदक्षणासाठी निघाली. भजन कीर्तना सह गावातून पालखी मिरवणूक चोखामेळा जन्मस्थळ जवळ आली त्यावेळी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते चोखोबांच्या पालखीचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर चोखामेळा जन्मोत्सवा च्या प्रमुख कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान चळवळीचे प्रा. तुषार हंसराज यांनी कीर्तनाद्वारे संत चोखामेळा यांचे जीवन विशद केले. अर्धा तास चाललेल्या त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले केवळ शासनाने निधी दिला नाही म्हणून ओरडत बसणे संयुक्त नाही, जन्मस्थळाच्या होणाऱ्या कासव गतीच्या विकासाला गावकरी, आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला साधल्यां न गेलेला समन्वय जबाबदार

आहे. यावेळी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, जि.प माजी सदस्य बाबुराव नागरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्प चे नाम प्रवर्तक प्रा. कमलेश खिल्लारे यांनी चोखामेळा जन्मस्थळ विकासाची भूमिका पुढे नेण्यासाठी विचाराचे समन्वय गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी चोखामेळा जन्मोत्सव हा लोकोत्सव होण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नझेर काझी, भाजप नेते, डॉ सुनील कायंदे, अ. भा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड, काँग्रेस नेते रमेश कायंदे, गंगाधर जाधव, लोकजागर प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रवीण गिते, अशोक पडघान, प्रा. दिलीप सानप, शिवदास रिंढे, प्रा. दिलीप झोटे, प्रकाश गिते, रामदास डोईफोडे, गजानन काकड, गजानन पवार, राजेश इंगळे, भगवान मुंढे, सुनील शेजूळकर, विष्णू झोरे, विष्णू बोन्द्रे, विष्णू बनकर, प्रकाश काकडे, विष्णू बोंद्रे, रवी काकडे, दिलीप खरात, दीपक चेके, श्रीमंत निकाळजे आधीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक व्ही. एस जाधव यांनी तर राष्ट्रवादी नेते गजानन काकड यांनी आभार व्यक्त केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये