ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपुर बेलदार समाज बांधवातर्फे कन्नमवार जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर स्वर्गीय श्री मा.सा. कन्नमवार यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त श्री बुग्गावार सामील येथे अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष श्रीनिवासजी बुगावार ,प्रमुख पाहुणे नगरपरिषद बल्लारपूरचे उपमुख्य अधिकारी रवींद्र जी भंडारवार, प्रमुख वक्ते प्राध्यापक  नागेश्वर गांडलेवार, समितीचे सचिव सुनीलजी बोपनवार, सामाजिक कार्यकर्ते  अनुपजी खुटेमाटे समितीचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवासजी तोटा ,ऐड. श्री किशोर पुसलवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश जी नायडू आदींची मंचावर उपस्थिती होती

मान्यवरांतर्फे कन्नमवार जींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख वक्ते नागेश गांडलेवार यांनी दादासाहेब कन्नमवार -एक संघर्षमय जीवन प्रवास या विषयावर मार्गदर्शन केले. मान्यवरा तर्फे दादासाहेब कन्नमवार यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय व औद्योगिक जडणघडणीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. यावेळी सर्व समाज बांधवांनी कर्मवीरांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन व भोजन व्यवस्था बुग्गावार सा मील चे संचालक श्रीनिवास बुगावार परिवार तर्फे करण्यात आले संचालन व प्रास्तविक ईश्वर नेरळवार व आभार प्रदर्शन सुनीलजी बोपनवार यांनी केले.

यावेळी समितीचे पदाधिकारी उपाध्यक्ष उमेश जी कोलावार, सहसचिव विलासजी बेझलवार,डॉ. सुनीलजी कुल्दीवार, भास्करराव तेल्लावार, अशोक नायडू श्रीनिवास चेरकुतोटावार, सुरेश नायडू संकेत नायडु, नयन नायडु, रमेश उद्धरवार, संकेत उध्दरवार सुरेश बोपनवार, राजु गादेवार, राजेश मारशेट्टीवार राकेश अडगुळवार, गणेश तोटेवार कुणाल बोपनवार,प्रफुल बोपनवार,प्रतीक बेझलवार,परीस महाजनवार नागेश नायडु,पवन बोपनवार,बंडु पीरसीगुलवार, अश्विनी बुगावार, रेखाताई बेझलवार, मीनाताई कुल्दीवार, सुनीता नायडू, मनीषा कोलावार,  शिल्पा नायडू,हेमलता चेरकुतोटावार, सुवर्णा नायडू, प्रगती बेझलवार, राणी गादेवार, भारती मारशेट्टीवार, संध्या नेरडवार, अमृता अडगुळवार ज्योतीताई तोटेवार, नंदा गंडलेवार उमा नायडु, श्रीमती नलीनीताई बेझलवार, आरती भोगावार, प्रचेता बोपनवार,सरीता भोगावार व बल्लारपुरातील असंख्य समाज बांधवांचे कार्यक्रमाला उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये