राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदावरून बडतर्फ करा!
सकल बंजारा समाजाची मागणी ; तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे टेन्शन वाढलेले आहे विरोधी पक्षाचे उमेदवार ज्येष्ठ नेते हरिभाऊ राठोड यांना धमकावत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.
त्यामुळे थेट नार्वेकर यांच्यावर कारवाईची मागणी जिवती तालुक्यातील सकल बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे. त्यांचे कारण नार्वेकरांनी बंजारा समाजाचे जेष्ठ नेते,माजी खासदार व आमदार ओबीसी नेते यांना अपमानित करून बोलल्यामुळे सकल बंजारा समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत एवढ्या मोठ्या संविधानिक पदाच्या व्यक्तीने एका ज्येष्ठ समाजसेवकाचा केलेला अपमान हा स्वाभिमानी बंजारा समाज मान्य करणार नाही त्यामुळे संपूर्ण भारतातील बंजारा समाजाची भावना दुखावली आहे म्हणून अशा जबाबदार संविधानिक पदावरील व्यक्तीने असे बोलल्यामुळे तत्काळ त्यांना पदावरून हटविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने जिवतीचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.
यावेळी सकल बंजारा समाजाचे पांडुरंग जाधव,अमर राठोड,गणपत आडे, डॉ अंकुश गोतावळे, सुदाम राठोड, दत्ता राठोड,कैलास राठोड, बंडू राठोड, टिकाराम राठोड, मुकेश चव्हाण, दयानंद राठोड, परमेश्वर चव्हाण, अंबादास पवार, गजानन आडे, सुरेश राठोड, उल्हास राठोड, उमेश आडे, दगडू राठोड, शंकर राठोड, हरिचंद्र राठोड, रामदास पवार, सूर्यकांत राठोड, केशव चव्हाण आदी बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.



