अवैद्य गोवंश तस्करी करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवर कारवाई
सहा जणांवर गुन्हा दाखल, तर ८.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
उमरी पोतदार पोलिसांची धडाकेबाज कारवाई,१४ जणांची सुटका
पोंभुर्णा तालुक्यातून दोन मिनी टाटा एस चारचाकी वाहनामधून काही व्यक्ती अवैध्य जनावरे वाहतूक करीत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पहाटे सहा वाजताच्या सुमारास डोंगरहळदी गावाजवळ उमरी पोतदार पोलिसांनी नाका बंदी केली.आणि वाहने येतानांचे बघून पोलिसांनी त्या वाहनांना थांबवले.आणि दोन्ही मिनी टाटा एस चारचाकी वाहनांची तपासणी केली असता, त्यात जनावरांना अमानुषरित्या १४ जनावरांना बांधून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनचालकांना जनावरांची आणि कागदपत्राची माहिती विचारली असता, वाहनचालकांनी काहीच नसल्याचे सांगितल्याने, पोलिसांनी दोन्ही वाहन, वाहनचालकांवर,कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यात वणी तालुक्यातील रंगनाथनगर येथील रहिवासी आरोपी,आसिफ हुसैन फारुक शेख वय(३८), शेख इमाम शेख मेहबूब (४७),सय्यद मो.राज मो.(४७), अजय विजय बुरचुंडे (२७), शेख इसराइल शेख अब्दुल (३८), शेख सुलतान शेख हुसैन (१८),यांच्या विरुद्ध उमरी पोतदार पोलीस स्टेशन येथे अपराध क्र.०१/२०२६,कलम ११(१) (घ)( ड )(च)(ज)भारतीय प्राण्यांना क्रूरपणे वागणुकीचा प्रतिबंध अधिनियम १९६० गुन्हा नोंदवून,त्यांच्या ताब्यातील एकूण १४ जनावरे,(१६ हजार रुपये) दोन टाटा एस (८ लक्ष रुपये) असे एकूण ८.१६ लक्ष रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असून त्या १४ जनावरांना प्राण वाचवून सुटका करण्यात आली.पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करत आहे.
ही कारवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले,यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे व उमरी पोतदार पोलीस करीत आहेत.



