वडनेर पोलिस स्टेशनची अवैध दारू तस्करांवर जोरदार कारवाई
घनश्याम पाटील पोलिस निरीक्षक पो.स्टे.वडनेर यांनी आरोपींना आणले आटोक्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वडनेर पोलिस स्टेशन हद्दीत प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार अवैध रेती (वाळू) चोरीची वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात वर्धा जिल्हाचे पोलिस अधीक्षक सुशीलकुमार अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट तहसीलचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनानुसार वडनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घनश्याम पाटील व पोलिस कर्मचारी यांनी धडक कारवाई करणे सुरू केलेले असून या कारवाईत वडनेर पोलिसांनी टिप्पर क्रमांक एम एच 27 बी ऐस 4523 ताब्यात घेतलेले असून त्यांची किंमत 15,00,000/-रुपये आहे तसेच सदर टिप्पर मध्ये वाहतूक होत असून 03 ब्रास रेती (वाळू ) किंमत 18,000/-रुपये असा एकूण 15,18,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध वडनेर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असून सदर कारवाई वडनेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार घनश्याम पाटील व पोलिस उपनिरीक्षक भारत वर्मा पोलिस शिपाई आकाश चेनुरवार हिमांशू टापरे दिनेश आंबटकर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली वडनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे वडनेर परिसरातील अवैध रेती (वाळू) वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याच्या संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



