कर्तव्यनिष्ठ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : पोलीस दलात प्रदीर्घ काळ आपली सेवा बजावून वयानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार सोहळा नुकताच पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे पार पडला. पोलीस उपाधीक्षक (गृह) श्री. पुंडलिक भटकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण निरोप देण्यात आला.
पोलीस दलातील शिस्त आणि जनसेवेचा वारसा समर्थपणे पेलत, सेवापूर्ती केल्याबद्दल श्री. भटकर यांनी सर्व सेवानिवृत्तांचे अभिनंदन केले. “पोलीस सेवा ही आव्हानात्मक असते, या प्रवासात कुटुंब आणि कर्तव्याची सांगड घालत तुम्ही दिलेले योगदान कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत त्यांनी सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांची यादीः
नाव व पदनाम कार्यरत ठिकाण सेवानिवृत्ती दिनांक
०१) सफी/५८३ विलास येनुरकर, वाहतूक शाखा, वर्धा, दि. ३०.११.२०२५
०२) सफी/११८१ संजय चाटे, वाहतूक शाखा, वर्धा, दि. ३०.११.२०१५
०३) श्रेणी पोउपनि /६६६ श्रीकृष्ण हिवराळे, पोलीस मुख्यालय, वर्धा, दि. ३१.१२.२०२५
०४) सफौ/२३८ विनोद भांडे, वाहतूक शाखा, हिंगणघाट, दि. ३१.१२.२०२५
०५) श्रेणी पोउपनि /३४४ गौरीशंकर जागेश्वर, वर्मा पुलगाव, दि. ३१.१२.२०२५
यावेळी पोलीस विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पोलीस दलातील आठवणींना उजाळा दिला. अत्यंत भावुक आणि उत्साही वातावरणात हा निरोप समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सायबर सेल चे सहायक निरीक्षक श्री आशिष चिलांगे यांनी केले.



