ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खा. धानोरकर यांचा जन्मदिवस अभिनव उपक्रमातून साजरा

वृद्धाश्रम व सफाई कर्मचाऱ्यांना भेट वस्तू व साड्या वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती शहर व तालुका काँग्रेस कमिटीचा पुढाकार

 चंद्रपूर वणी-आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा वाढदिवस आज दिनांक ९ रोजी स्थानिक काँग्रेस कमिटी कार्यालयात साजरा करण्यात आला.

काँग्रेसचे तालुका प्रमुख प्रशांत काळे व शहर अध्यक्ष सुरज गावंडे, महिला शहर अध्यक्षा, माजी नगराध्यक्षा सरिता सूर, माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य ॲड सुनील नामोजवार यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाचे अभिनव औचित्य पार पडले. काँग्रेस कार्यालयात असंख्य कार्यकर्ते व हितचिंतकांच्या उपस्थितीत केक कापून त्यांना निरोगी व यशस्वी आयुष्याच्या शुभकामना देण्यात आल्या.

यावेळी काँग्रेस पक्षातर्फे नगर परिषद भद्रावती येथील महिला सफाई कर्मचाऱ्यांना मकरसंक्रात सणाच्या औचित्यावर साडी चे वाटप केले. त्यानंतर वृद्धाश्रमातील गरजूंना भेट वस्तू व खाद्यपदार्थ वितरीत करण्यात आले.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका तथा गट नेत्या सरिता सूर, कल्पना भुसारी, उषा जाधव, पल्लवी तामगडे, सीमा पवार,तालुका प्रमुख संध्या पोडे तसेच नगरसेवक अनिल पडोळे, फय्याज शेख, प्रथम गेडाम तसेच आगामी नेतृत्व मानस धानोरकर आदी उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संदीप चटपकार, सुयोग धानोरकर, निखिल दादा राऊत, रामदास सूरआदींनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये