भद्रावती येथे भव्य जागतिक पारायण सोहळ्याचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ येथील जागतिक पारायण समिती च्या वतीने दिनांक ११ जानेवारी २०२६ रोज रविवारी मुर्लीधर पाटील गुंडावार लॉन येथे सकाळी ०६ वाजता भव्य जागतिक पारायण सोहळा निमित्त श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायणा चे आयोजन करण्यात आले आहे. भव्य जागतिक पारायण सोहळा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात पहाटे पाच वाजता श्री. चा अभिषेक, श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण वाचन वेळ सकाळी सहा ते दुपारी तीन पर्यंत राहनार आहे.
दिनांक १० जानेवारी रोज शनीवार ला दुपारी ४ वाजता मुर्लीधर पाटील गुंडावार लॉन येथून श्री च्या पालखीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही पालखी शहरातील मुख्य मार्गाने निघणार आहे. या पालखी सोहळ्यात व श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण सोहळ्यात मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन जागतिक पारायण समिती तर्फे करण्यात आले आहे.



