पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या वाढदिवसा निम्मीत नालवाड़ी येथे निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दत्ता मेघे विचार मंच, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) तसेच वरुण पांडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे राज्यमंत्री तसेच वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. पंकजभाऊ भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त नालवाडी व महसाळा येथील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर आरोग्य शिबिर सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत नालवाडी ग्रामपंचायत परिसर, नागपूर रोड, वर्धा येथे होणार आहे. या शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तशर्करा (ब्लड शुगर), हृदयरोग, मोतीबिंदू, पोटाचे विकार, महिलांचे आजार, बालरोग तसेच हाडांचे व मणक्याचे आजार आदींवर मोफत तपासणी व मार्गदर्शन आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे ) येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे.
यासोबतच समाजहिताचा विचार करून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वरिष्ठ भाजप नेते मा. श्री. गुंडुभाऊ कावळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी खासदार मा. श्री. रामदासजी तडस राहणार आहेत. कार्यक्रमास विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नालवाडी, म्हसाळा व परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन विनीत वरुण गोकुलजी पांडे प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी व संस्थापक अध्यक्ष दत्ता मेघे विचार मंच तसेच वरुण पांडे मित्र परिवार, नालवाडी–महसाळा, वर्धा यांच्या वतीने करण्यात आले आहे.



