ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक अनोळखी मृतक पुरूषांचे मृतदेह आढळला आहे ओळख असलेल्या व्यक्तीने सेवाग्राम पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा

निलेश वाडीवा पोलिस उपनिरीक्षक सेवाग्राम पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी नामे धर्मपाल भाऊराव ओरके वय 49 वर्ष राहणार साटोडा तालुका जिल्हा वर्धा धंदा पोलिस पाटील साटोडा मोबाईल नंबर 9356017625 यांनी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे सकाळी 10.45 च्या दरम्यान येऊन तोंडी रिपोर्ट दिली की नागपूर यवतमाळ बायपास रोडच्या बाजूला असलेल्या निवेदीता विलीयम आश्रम जवळ वर्धा येथे एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत पडून दिसून येत आहे याकरिता पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे मर्ग क्र.01/2026 कलम 194 भा.ना.सु.सं.2023 दाखल करण्यात आला यानंतर सेवाग्राम पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतरकर व पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक येरणे आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन अनोळखी मृतक इसमाच्या मृतदेहाचा पंचमाना करून त्याचे पी.एम करून पोलिसांनी मृतकाची अंत्यविधी केली आहे मृतकाचे वर्णण अशाप्रकारे आढळून आले उंची 5 फुट 6 इंच वय अंदाजे 45 ते 50 वर्ष पांढ-या केसांची बारीक दाढी डोक्याचे केस काळे पांढरे रंग सावळा डाव्या हातावर टॅंटू व इंग्रजीत एम एस गोंदवले उजव्या हातात स्टिलचा कडा दोन बोटात ताब्यांच्या अंगठ्या अंगात मेहंदी रंगाचे पुर्ण बाह्याचे जरकिन लाल रंगाचे पुर्ण बाह्याचे टि शर्ट त्याखाली पिवळया रंगाचे टि शर्ट व निळ्या रंगाचा फुलपॅंट व त्याखाली निळ्या रंगाचा फुलपॅंट घातलेला असून वरील वर्णनाचा व्यक्ती किंवा इसम हरविला किंवा बेपत्ता असल्यास किंवा माहिती असल्यास खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक संपर्क साधावा पोलिस निरीक्षक नागेश कुमार चतरकर पोलिस स्टेशन सेवाग्राम मोबाईल नंबर 8888813735 पोलिस उपनिरीक्षक दिलीप कडू पोलिस स्टेशन सेवाग्राम मोबाईल नंबर 9890794801 व पोलीस उपनिरीक्षक निलेश वाडीवा पोलिस स्टेशन सेवाग्राम मोबाईल नंबर 9765128644 यांच्या सोबत संपर्क साधावा अशी मागणी पोलिस स्टेशन सेवाग्राम यांनी दिलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये