भद्रावती शहरातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : नगराध्यक्ष प्रफुल चटकी
नगराध्यक्षपदी प्रफुल चटकी तर उपाध्यक्षपदी सुधीर सातपुते यांनी पदभार स्वीकारला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगर परिषदेचा पदग्रहण सोहळा गुरुवार, दिनांक ८ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मताधिक्याने निवडून आलेले नगराध्यक्ष प्रफुल रामदास चटकी यांनी विधिवत पदभार स्वीकारला. याच वेळी उपाध्यक्षपदी सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले सुधीर सातपुते यांनीही पदभार स्वीकारला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी काम पाहिले. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) तर्फे सुधीर सातपुते, तर काँग्रेसकडून अनिल पडोळे यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते.
झालेल्या मतदानात सुधीर सातपुते यांना १८ मते, तर अनिल पडोळे यांना १२ मते मिळाली. सहा मतांच्या फरकाने सुधीर सातपुते यांनी विजय संपादन केला. स्वीकृत सदस्यांची नियुक्ती सत्तारूढ पक्षाच्या वतीने राजेश बदखल तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नरेंद्र पढाल यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर काँग्रेस पक्षाकडून सुनील नामोजवार यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. पदग्रहण दालनाचे उद्घाटन नगराध्यक्ष पदग्रहण दालनाचे उद्घाटन शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भद्रावती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन पदग्रहण सोहळ्याचा कार्यवृत्तांत राजू काळे यांनी सादर केला, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उपमुख्याधिकारी विजय जांभुळकर यांनी केले. जनतेला दिले आश्वासन यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी भद्रावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असून, शहरातील जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे ठाम आश्वासन दिले



