ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय लाठी स्पर्धेत आदर्श देविदास कांबळे यांना सुवर्ण पदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल गडचांदूरचे विद्यार्थी आदर्श देविदास कांबळे यांनी ६ व्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत भाग घेऊन सुवर्ण पदक मिळविले.

ट्रॅडिशनल लाठी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया- २०२५ चे मध्यप्रदेशातील उज्जैन येथे नुकतेच सहावी राष्ट्रीय लाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरीता आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल गडचांदूरच्या वतीने तेरा वर्षीय आदर्श देविदास कांबळे यांना पाठविण्यात आले. या स्पर्धेत आदर्श कांबळे यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून सुवर्ण पदक पटकावले.

बाल वयापासून लाठीकाठी या खेळाची आवड असलेले आदर्श कांबळे यांनी या पहिले चंद्रपूर येथील जिल्हा लाठी स्पर्धेत भाग घेऊन दुसरे रजत पदक तसेच बल्लारपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य स्पर्धेत भाग घेऊन तिसरे कांस्यपदक पटकावले आहे.

लाठी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श कांबळे यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुवर्ण पदक पटकावून आदर्श कांबळे यांनी आपल्या शाळेसोबतच जिवती तालुक्यातील केकेझरी गावाचे आणि आपल्या आईवडिलांची मान सुद्धा उंचावली आहे.

आदर्श देविदास कांबळे यांना राष्ट्रीय लाठी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्याची माहिती मिळताच आदर्शचे आजोबा कै. भगवान कांबळे यांचे गडचांदूर येथील मित्र अशोककुमार उमरे रिपाइं महाराष्ट्र प्रदेश चिटणीस, अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, साप्ताहिक विदर्भाचे वीर चे संपादक प्रभाकर खाडे, खनके मुद्रणालयचे मालक सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल खनके, मिथुन कांबळे थुट्रा इत्यादींनी आदर्श देविदास कांबळे तसेच देविदास भगवान कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये