ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रासेयो श्रम संस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाभिमुक व नेतृत्व गुणाचा विकास होतो – माजी आमदार सुभाष धोटे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना युवा नेतृत्व व श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा आसन खु येथे. गट ग्रामपंचायत बिबी या ठिकाणी संपन्न झाला.

या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी भूषविले तर या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे संचालक डॉ. अनिलराव चिताडे यांनी भूषविले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष विकासभाऊ भोजेकर, माधुरीताई टेकाम सरपंच गट ग्रामपंचायत बीबी, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, उपमुख्याध्यापक विजय डाहुले, उपसरपंच आशिष देरकर, राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रदिप परसुटकर, बंडू नैताम ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण आडे पोलीस पाटील आसन बु., सोमेश्वर आडे माजी सैनिक, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असन बु. नंदाताई येसेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय स्वयंसेवक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी केले. संचालन प्रा सुधीर थिपे यांनी केले तर आभार प्रा.चेतना कामडी यांनी मानले.

कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये