आसन बु. ता. कोरपना येथे कबड्डी स्पर्धेचे उत्सहात बक्षीस वितरण संम्पन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
क्रांतिवीर बापूराव शेडमाके क्रीडा मंडळ आसन बु. गेडाम गुळा द्वारा आयोजित तीन दिवसीय भव्य पुरुषाचे कबड्डी सामने आयोजित केले होते, त्या कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण दिनांक 7 जानेवारी 2026 ला सायंकाळी नऊ वाजता संपन्न झाले.
या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा आदिवासी सामाजिक कार्यकर्ते प्रमोदभाऊ कोडापे हे होते, तर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून, मंगलदास गेडाम माजी सरपंच बीबी,अशोक भाऊ कुडमेथे ,सेवानिवृत्त श्री. सोमेश्वर पाटील आडे माजी सैनिक, प्रवीण आडे पोलीस पाटील, नागोराव आत्राम,प्रशांत पाचभाई, सागर धुर्वे, छगन गेडाम,आदी मान्यावर उपस्थित होते.
प्रथम कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक धानोली भद्रावती तालुका सन्मानचिन्ह व रोख पंधरा हजार रुपये पटकाविले. व द्वितीय पारितोषिक कारवाई (सांगोळा )संघ यांनी पटकावीला. या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वैभव मरसकोल्हे,अजय मडावी, प्रफुल सुरपाम, सुनील गेडाम, नरेंद्र गेडाम, अमोल सोयाम,संदीप कोटनाके, रितेश केला रवींद्र गेडाम, रितेश गेडाम, प्रज्योत सुरपाम, चेतन सोयाम,अनिल मडावी, समीर पंधरे, व गावातील युवा, महिला भगिनी, पुरुषांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सहकार्य केले.



