उपरवाही येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन उत्साहात
“शिक्षणाचा आनंद” पुस्तकाचे प्रकाशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उपरवाही येथे १९९८-९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन रविवारी उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आनंद धुर्वे, आनंदराव माथुलकर, नागेश्वर भटपल्लीवार, धनंजय शास्त्रकर तसेच विमल भगतकर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकांचा शॉल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या विशेष प्रसंगी माजी विद्यार्थी नथ्थू मत्ते यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘शिक्षणाचा आनंद’ हे मराठी पुस्तक प्रकाशित केले. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस आलमारी भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक गिरीधर पानघाटे यांनी केले. यावेळी गणेश निमगाडे, प्रफुल्ल चिवाने, संदीप मडावी व माधव ढाकणे आदी शाळेतील कार्यरत शिक्षक उपस्थित होते.
या स्नेहमिलनाचे यशस्वी आयोजन सगुणा लोनगाडगे, आशा लोनगाडगे, गोपिका परसुटकर, सुरेखा मेश्राम, धनराज पिंपळशेंडे, नीलकंठ कोंगरे, नथ्थू मत्ते, साईनाथ सिडाम, राजेंद्र मडावी, अनिल बोंडे, राहुल उपगणलावार, रविंद्र पेगडपल्लीवार व किशोर पानघाटे या माजी विद्यार्थ्यांनी केले.



