नंदोरी ग्रामवासीयांसाठी अभिमानाचा क्षण : पूल मंजुरीनिमित्त भव्य सत्कार समारंभ
300 नागरिकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील रहिवासी नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पुलाच्या प्रश्नावर जनआंदोलनातून मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर दिनांक 4 जानेवारी रोजी नंदोरी गावात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या वतीने पुलाच्या बांधकामासाठी ₹1 कोटी 97 लाख रुपयांची मंजुरी मिळाल्याने नंदोरीतील इंदिरानगर रहिवासी, शेतकरी, महिला, युवक तसेच शाळकरी मुला-मुलींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सत्कार समारंभाचे अध्यक्ष शिवसेना लोकसभा संघटक मुकेश भाऊ जीवतोडे होते. कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगर परिषद भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल भाऊ चटकी, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ शिंदे हे प्रमुख उपस्थितीत होते. तसेच युवासेना जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे, युवासेना लोकसभा सचिव सुरज भाऊ शाहा, युवासेना जिल्हा संघटक सुमित भाऊ हस्तक यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच भद्रावतीचे नवनियुक्त नगरसेवक महेश भाऊ जीवतोडे व नवनियुक्त नगरसेवक संतोष भाऊ कुरेकार सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलाच्या अभावामुळे मागील वर्षी वाहून गेलेले स्वर्गीय श्री. कवडुजी येटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा नंदोरी ग्रामवासी व इंदिरानगर रहिवाशांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या वेळी एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील सर्व रहिवासी नागरिकांनी एकत्र येत शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला.
शिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तब्बल 300 नागरिकांचा भव्य पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडला. या पक्षप्रवेशामुळे नंदोरी व इंदिरानगर परिसरात शिवसेना अधिक बळकट झाली असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी मान्यवरांनी सांगितले की, नंदोरी पूल प्रश्नावर उभारण्यात आलेल्या पायदळ यात्रा आंदोलनामुळेच प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर शासनाला निधी मंजूर करावा लागला. हा विजय जनतेच्या एकजुटीचा व शांततामय संघर्षाचा आहे.
कार्यक्रमाचे आयोजन युवासेना भद्रावती तालुका संघटक निलेश उरकुळे, युवासेना सदस्य चंदूभाऊ मडावी व समस्त नंदोरी ग्रामवासी यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी सभापती धनराज गुरुजी विरुटकर, ग्रामपंचायत सदस्य किशोरभाऊ उमरे, शुष्मलताताई ठेंगणे, वरोरा विधानसभा प्रमुख मुनेश्वर बदखल, भद्रावती युवासेना शहर प्रमुख राज चव्हाण, वरोरा युवासेना शहर प्रमुख चेतनभाऊ सातपुते, वरोरा तालुका संघटक प्रशांत धुळे, आणोख गेडाम, सुबोध कुरेकार, श्रीधरभाऊ आत्राम, सुरज घुमे, नंदोरी गावातील शेतकरी वर्ग, महिला, युवक तसेच शाळकरी मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी स्पष्ट इशारा दिला की, पुलाचे काम तातडीने व गुणवत्तापूर्ण पूर्ण झाले पाहिजे, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.



