
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
राजुरा येथिल प्रसिद्ध व्यावसायिक तसेच शिवराव देशपांडे नगराचे मुळ जागा मालक अविनाश शिवराव देशपांडे ह्यांचे शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी वयाच्या 73 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले असुन त्यांच्या पार्थिवावर रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 11:00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अविनाश देशपांडे हे राजुरा येथिल शिवा पेट्रोलियमचे मालक होते तसेच शहरातील उच्चभ्रु वसाहत असलेल्या शिवराव देशपांडे नगर त्यांच्याच शेतजमिनीवर वसविण्यात आले होते. त्यांच्यापश्चात पत्नी, अथर्व व कैवल्य अशी दोन मुले आहेत.



