अज्ञात कंटेनरची ट्रेलरला धडक
संबंधिताला अटक करून गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि.१४/११/२०२५ रोजी समृध्दी महामार्ग वर्धा रोडवरील येळाकेळी पेट्रोल पम्पावर सकाळी ०२.३० वा चे दरम्यान आयशर क्र. एमएच १२ पि क्यू १२२० चा एका अज्ञात कंटेनर/ट्रेलरला धडक लागून आयशर क्र.एमएच १२ पि क्यु १२२० मधील ड्रायव्हर नामे लखन चंद्रकांत काळुंके वय २२ वर्ष रा ऑयेडकर नगर, साईचाबा मंदीर जवळ, मार्केट यार्ड पूणे हा मरण पावला व त्याचे सोचतथा सहकारी ईस्माईल ईक्यारन सैदुवाले वय २५ वर्ष हा जख्मी झाला व अपघात करणारे अज्ञात कंटेनर ट्रेलर हे घटनास्थळावरुन फरार झाले.
पोलीस स्टेशन सांवगी मेघे जि. वर्धा येथे फिर्यादीचे तक्रारीवरुन अपराध क्र. ८९०/२०२५ कलम १०६(१),२८५,३२४(४) भारतीय न्याय संहीता-२०२३, सहकलम १८४.१३४.१७७ मो वा का.प्रमाणे दि.१४/११/२०२५ रोजी गुन्हा नोद करुन सदर गुन्हयाचे तपास पोउपनी संदीप सावले व पथक हे करीत असुन सदर गुन्हयामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसुन तसेच घटनास्थळाचे आजुबाजुला स्वष्ट सिर्सागढीको फुटेज सुध्दा उपलब्ध नसल्याने तसेच अज्ञात वाहना बायत कोणतीही माहीती नसल्याने सदर गुन्हयामध्ये तांत्रीक पध्दतीने तसेच कला-कौशल्याचा वापर करुन गुन्हयाचा तपास केला असून सदर गुन्हयामध्ये समृध्दी महामार्गावरील १३०० वाहने चेक करुन तपास केला व गुन्हयातील अज्ञात वाहन ट्रोलर क्र.एम एच ४० बिजी ८८६७ हे निष्पण करुन त्याचा चालक नामे शामकिशोर मुरलीप्रसाद पांडे वय ४२ वर्ष रा.देवरी, ता लालगंज जि मिर्झापुर (यूपी) ह.मु. महालगांव, टाटा यार्ड, भंडारा रोड, नागपूर यांस गुन्हयात दि.०१/०१/२०२६ रोजी अटक करुन सदरील गुन्हा उघडकिस आणला.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर साहेब वर्धा उपविभाग, वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज बाघोडे, पोउपनी की संदीप साचले. पोउपनी श्री सचीन कानडे, पोशी हर्षल मुन ब.नं.६९४, पोशी अमोल जाध्य क.नं.२८२ तसेच मत्रीशी अंजली गाडेकर ब.नं. ४३२ यांनी सदरची कार्यवाही केली.



