ले-आउटमधील मोकळ्या जागेची नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगर परिषदेच्या गुरुनगर प्रभागातील ले-आउटमधील मोकळ्या जागांवरील कचरा व झुडपी जंगल साफसफाईचे काम नवनियुक्त नगरसेवक महेश जीवतोडे यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
गुरुनगर प्रभागातील अनेक ले-आउटमधील मोकळ्या जागा कचरा, झुडपी वाढ व झाडांमुळे नागरिकांच्या वापरासाठी अनुपयोगी ठरल्या होत्या. या ठिकाणी साचलेल्या घाणीमुळे डुकरांचा व मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. याबाबत नागरिकांनी अनेकदा नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या होत्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये होती.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत गुरुनगर प्रभागातून निवडून आलेले नगरसेवक महेश जीवतोडे यांनी, शिवसेना (शिंदे गट)चे लोकसभा प्रमुख मुकेश जीवतोडे तसेच नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम ले-आउटमधील खुल्या मोकळ्या जागांची स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
या स्वच्छतेमुळे मच्छर व डुकरांचा प्रादुर्भाव कमी होऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळणार असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.



