ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोशन कुडे यांना न्याय मिळावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ३ जानेवारी रोजी पायदळ जन आक्रोश मोर्चा!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 ब्रम्हपुरी :- कृषिप्रधान भारतात एक महत्त्वाचा आणि नवा संघर्ष सुरू झाला आहे. रोशन कुळे या शेतकऱ्याच्या दुर्दैवी घटनेने एकाएकी संपूर्ण समाजाला धक्का दिला आहे.

अवैध सावकारांनी त्याच्यावर १ लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल ७४ लाख रुपयांची वसुली केली. या भयंकर कर्जाच्या ओझ्यामुळे त्याला शेती, वाहने, सोनं विकावं लागलं, आणि अखेर परिस्थिती एवढी गंभीर झाली की त्याला स्वतःची किडनी विकावी लागली. शेतकऱ्यांवरील असा अमानवीय आणि अकल्पनीय त्रास शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकरी नेते माजी आमदार बच्चू कडू , कॉम्रेड विनोद झोडगे आणि विविध शेतकरी संघटनांच्या सहकार्याने ३ जानेवारी २०२५ रोजी पायदळ जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.

हा मोर्चा मिंथुरपासून नागभीड तहसिल कार्यालय पर्यंत पायदळ निघणार आहे. यामध्ये रोशन कुळे यांची आर्थिक शारीरिक व मानसिक व इतर प्रकारे पिळवणूक करणाऱ्या अवैध सावकारांना व मानवी अवयव तस्करीतील सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, रोशन कुळे यांना शासकीय नौकरी देण्यात यावी.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांना पेन्शन, हमीभाव, स्वामीनाथन आयोग लागू करा. गोसेखुर्द धरण उजव्या कालव्याचे पाणी उन्हाळी धान पिका करिता त्वरित द्या यासह विविध प्रमुख मागन्या करण्यात येणार आहे.या मोर्चाच्या नियोजनासाठी २६ डिसेंबर रोजी शासकीय विश्राम गृह, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ब्रम्हपुरी येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चाच्या आयोजनाच्या सर्वांगीण तपशिलांची चर्चा करण्यात आली.

यावेळी जन आक्रोश मोर्चा चे निमंत्रक कॉ.विनोद झोडगे, राहुल पांडव, प्रशांत डांगे, अन्यायग्रस्त शेतकरी रोशन कुळे, गिरीधर नवघडे, रवींद्र पिलारे,राहुल भोयर,दीपक नवघडे, विनोद नवघडे, मिलिंद भन्नारे, अँड आशिष गोंडाने, शंकर दादा सातपुते, निलेश बनकर, भुजंग राऊत, लिलाधर कोटगले, डॉ.राहुल मेश्राम, दिवाकर डांगे, नानेश्वर गुरपुडे, जयदेव भजनकर, दत्तू नागोसे, स्वप्निल राऊत, अमरदीप मेश्राम, प्रभाकर दिवटे,अमित रामटेके उपस्थित होते.मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जन आक्रोश मोर्चा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये