ने.हि.महाविद्यालयात रंगले प्राध्यापकांचे गीतगायन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची प्राध्यापकांची गीतगायन स्पर्धा प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकरांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दोन तास रंगली.यात संगीत भजनापासून मराठी, हिंदी चित्रपट गीते, भावगीते, नाटयगीते प्रकारांची मेजवानी उपस्थितांना मिळाली.
गीतगायन स्पर्धेत प्रामुख्याने डॉ. राजेंद्र डांगे, डॉ. धनराज खानोरकर, डॉ असलम शेख, डॉ. मोहन कापगते, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ अजय खाजगीवाले, डॉ. मिलिंद पठाडे, डॉ वर्षा चंदनशिवे,प्रा. बालाजी दमकोंडवार, प्रा. निलिमा रंगारी,प्रा. प्रियंका उईके,प्रा. अभिजित परकरावार,प्रा.अन्सारी, संजय मेश्राम इत्यादींनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.संचालन संजू मेश्राम तर सर्वांचे आभार सांस्कृतिक प्रभारी डॉ. पद्माकर वानखडेंनी मानले.



