ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात युवा वक्त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान, समतेचे मूल्य आणि आत्मविश्वास याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

युवा वक्ते हर्षल साळवे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून समाजातील असमानता, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आणि विवेकी विचारसरणी यावर ठाम भूमिका मांडली. वक्तृत्व व वादविवादाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास कसा साधता येतो, याचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

     दुसरे युवा वक्ते सिद्धार्थ चव्हाण, सध्या महाराष्ट्र सुरक्षा बल, मुंबई येथे कार्यरत असून, त्यांनी महापुरुषांचे विचार,शिस्त, सातत्य, अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, हे आपल्या अनुभवातून सांगितले. महाविद्यालयीन स्तरावरील अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

       कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करीत महाविद्यालय आणि संस्थेचा नावलौकिक करावाअसे आवाहन विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे,प्रा. विजय मुप्पीडवार उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. सोज्वल ताकसांडे यांनी तर आभार प्रदर्शन करण लोणारे यांनी केले.

या समाजप्रबोधन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती होऊन सामाजिक जाणीव वाढल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. अशोक सातारकर, प्रा जहिर सय्यद, प्रा.दिनकर झाडे, प्रा  नितीन सुरपाम, प्रा.जयश्री ताजने, प्रा. राजेश बोळे, प्रा. नितीन टेकाडे, प्रा. अनिल मेहरकुरे, प्रा. शिल्पा कोल्हे, सीताराम पिंपळशेंडे व विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये