ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दगडवाडी येथे महिला शेती शाळा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी रघुवीर वाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन पोखरा योजनेअंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान महिला शेती शाळा 31 डिसेंबर रोजी संपन्न झाली.

देऊळगाव राजा कृषी कार्यालया यांच्या माध्यमातून दगडवाडी येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञान हरभरा पिक शेती घेण्यात आली,याबाबत सविस्तर माहिती कृषी सहाय्यक मेहेत्रे मॅडम यांनी देऊन ए आय ॲप बाबत सुद्धा सविस्तर माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली,तसेच 25 डिसेंबर रोजी मेहकर उपविभागातील तालुका देऊळगाव राजा अंतर्गत दगडवाडी येथे ग्राम कृषी विकास समितीची सभा पार पडली यामध्ये सुद्धा विविध प्रकल्प मध्ये चालू असलेल्या सर्व घटकांची माहिती देण्यात आली यावेळी गावातील महिला बचत गट समिती सदस्य सरपंच कृषी ताई व गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये