लोणी येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष निलेश ताजने यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- पुर्व विदर्भात प्रख्यात असलेल्या गंगा मातेच्या माहेरस्थानी गडचांदुर येथिल नवनिर्वाचित नगराध्यक्ष निलेश ताजणे व नगरसेवकांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला.
यावेळी संपुर्ण ग्राम स्वागतासाठी एकवटले ढोल ताशांच्या गजरात,फटाक्यांच्या आतिषबाजीत परिसर दुमदुमला.
सत्कारमुर्ती मंडळिंनी संत फुलाजी बाबा यांचे दर्शन घेऊन गंगा मातेच्या दर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष निलेश ताजने, नगरसेवक रामसेवक मोरे, नगरसेवक महेश आवारी,नगरसेविका अश्विनीताई कांबळे,सारीकाताई डोर्लिकर यांचे समवेत युवा उद्योजक संतोष मोरेवाड, प्रभावशाली व्यक्तीत्व संदिप शेरकी यांचा यावेळी गावकऱ्यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी येथील माजी सरपंच मारोती मुसळे,प्रमुख अतिथी म्हणून घनश्याम नांदेकर,वासुदेव आवारी,रामसेवक मोरे,संदिप शेरकी, संतोष मोतेवाड, अश्विनी ताई कांबळे,सारीकाताई डोर्लिकर उपस्थित होत्या.
यावेळी निलेश ताजने यांचा जिवनसंघर्ष उपस्थितांना विशद करण्यात आला.सर्वांनी कुतुहलाने तो ऐकला.
समृद्ध असे लोणी ग्राम माझ्या हृदयात बसलेले गाव आहे.येथिल तरूणांच्या समस्यांचे निरासरण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहिल असे आश्वासीत निलेश ताजने यांनी संबोधनात सांगितले.
यावेळी गावातील अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुण मंडळींनी विशेष पुढाकार घेतला.
कार्यक्रमाला गावातील युवा मंडळी, जेष्ठ मंडळी आणि मातृशक्ती बहुसंख्येने उपस्थित होत्या.



