वन्यजीव प्रेमींनी वाचविले जखमी घुबडाचे प्राण
वन्यजीव प्रेमींनी जखमी घुबडाला दिले जीवनदान

चांदा ब्लास्ट
दिनांक ०२.०१.२०२६ ला पहाटे चंद्रपूर येथील घुटकाला निवासी चंद्रमणी कातकर व त्यांच्या पारिवारिक सदस्यांना त्यांच्या घराच्या समोरील झाडाच्या फांदीत नायलॉन मांज्याला गुंडाळून जखमी अवस्थेत एक वयस्क घुबड आढळले. घुबड नायलॉन मांज्याच्या तेज धारेमुळे अत्यंत झखमी होऊन, घुबडाच्या शरीरातून रक्त वाहत होते. चंद्रमणी कातकर यांनी जखमी घुबडाच्या उपचारासाठी खत्री कॉलेजचे कर्मचारी अमित राठोड यांना संपर्क केले व अमित राठोड यांनी चंद्रपूर बचाओ संघर्ष समितीचे वन्य जीव संयोजक ॲड.आशिष मुंधडा यांना संपर्क केले.
परिस्थितीची गंभीरता समजून ॲड.आशिष मुंधडा हे स्वतः घुटकाला येथील घटनास्थळी उपस्थित झाले व लगेच जखमी घुबडाला व स्थानिक वन्यजीव प्रेमी स्वयंसेवकांना सोबत घेऊन, खाजगी चारचाकी वाहनाने जखमी घुबडाच्या प्रथोमचाराकरिता पशु रक्षण व उपचार संस्था प्यार फाऊंडेशनच्या पशुआश्रम येथे पोहचले. प्यार फाऊंडेशन येथे घायळ घुबडाचे प्रथोमचार करून वन विभागाच्या कार्यलयात पाठविण्यात आले.
या बचाव कार्यातून/(Rescue Operation) प्रशासनाला स्थानिक वन्य जीव प्रेमींतर्फे नम्र विनंती आहे कि, चायनीज नायलॉन मांज्यावर लगेच कठोर नियम आखून, अश्या मांज्यावर बंदी घालून, कठोर कार्यवाही करण्यात यावी ज्यामुळे अश्या अप्रिय घटना पुढे होणे होणे थांबेल.
ॲड.आशिष मुंधडा यांनी माहिती दिली की, वन्य जीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ या कायद्या अंतर्गत भारतातील सर्व प्रकारचे घुबड संरक्षित आहेत. बहुतेक घुबडांच्या प्रजाती अनुसूची १,२,४ व अन्य अनुसूची मधे समाविष्ट आहेत. पर्यावरणीय महत्त्व तसेच बेकायदेशीर व्यापार आणि अंधश्रद्धेमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांमुळे भारतात घुबडांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. घुबडांचे संरक्षण केल्याने पर्यावरणीय समतोल व जैवविविधता संवर्धनाच्या बांधिलकीला पाठबळ मिळते.
चंद्रपूर हे अनेक वन्यजीवांच्या व जंगलाच्या भोवताली स्थापित असेलेले नगर आहे व वन्य पशु, पक्षी, जीव यांचे संरक्षण करणे हे चंद्रपूर येथील सर्व नागरिकांचे मानवी कर्तव्य आहे.
या बचाव कार्य उपक्रमात चंद्रमणी कातकर,अमित राठोड, ललिता कातकर, पंचशीला उमरे, जयंत निमगडे, ॲड.आशिष मुंधडा, प्यार फाऊंडेशन व अन्य स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.



