ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

83 वा जन्मदिवस सोहळा शिक्षकांनी वडिलांचा केला साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील शिक्षक शत्रुघ्न सिताराम तुमराम सर यांनी स्वतःच्या शेतात वडिलांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आजच्या युगामध्ये आई-वडील नकोसे वाटते पण आई वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले गुरु आणि आदर्श असतात.

जे निस्वार्थ प्रेम संस्कार मार्गदर्शक आणि त्याग करून मुलांना घडवतात ते आपल्यासाठी जग जिंकून घेण्यासाठी आवश्यक असलेले धर्य आत्मविश्वास आणि मूल्ये देतात त्यामुळे आपण एक चांगला माणूस म्हणून बनू शकतो .त्यांचे आदर्श म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारे आधारस्तंभ आहेत.ज्याचा आदर करणे आणि त्यांचे ऐकणे महत्त्वाचे आहे म्हणून आई-वडिलांचा या समाजामध्ये आदर्श राहावा व आई-वडिलांचा सन्मान मिळावा यासाठी अनोखी उपक्रम शत्रुघ्न सिताराम तुमराम सर यांनी 83 वा वाढदिवस मौजा दुर्गाडी रोडवर असलेल्या शेतीमध्ये करण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात वाढदिवसाला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये