व्यसनाधीनतेकडे तरुणाईचा वाढता कल _ युवा पिढीस घातक
मनीषा कदम - उपविभागीय पोलीस अधिकारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आजच्या विज्ञान युगामध्ये ज्या पद्धतीने मानव प्रगती करत आहे. एकीकडे आधुनिकतेची कास धरत असताना उद्याचे भविष्य असणारे नवयुवक ज्या पद्धतीने व्यसनाच्या आहारी जात आहेत. हे भविष्यात येणाऱ्या पिढीला अत्यंत धोकादायक तसेच घातक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी 31 डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. पोलीस उपविभागीय कार्यालय, देऊळगाव राजा,आधार व्यसनमुक्ती केंद्र, आणि तालुका पत्रकार संघ दे राजा यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगाव राजा येथे 31 डिसेंबरच्या रात्रीला बस स्थानक परिसरात व्यसनमुक्ती,मानसिक आरोग्य सजग जीवनशैलीच्या प्रचारासाठी एक अर्थपूर्ण व समाज उपयोगी कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. दारू नको, दूध घ्या हा संदेश समाजात रुजवण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी यावेळी पोलीस रेकॉर्डला सद्यस्थितीमध्ये कौटुंबिक हिंसाचार, पती-पत्नी बेबनाव, युवकांमध्ये वाढते गुन्हेगारीचे प्रमाण , त्यातून जडणारे व्यसन आणि व्यसनासाठी लागणारा पैसा उपलब्ध करण्यासाठी युवक हे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असून. हे येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक तसेच प्रचंड घातक असल्याचे सांगत व्यसन करणाऱ्यांना फक्त कोणतेही निमित्त हवे असते त्यामध्ये लग्नकार्य, मित्राचा वाढदिवस, खूप टेन्शनमध्ये आहे अशा प्रकारचे कारण शोधून सदर युवा पिढी व्यसनाला बळी पडत असून पालकांनी सुद्धा आपला पाल्य दिवसभर काय करत असतो याकडे लक्ष देणे गरजेचे असून बालवयापासून आपल्या पाल्याला मोबाईलचे व्यसन कशाप्रकारे जडते त्यामुळे तो अभ्यासापासून कोसो दूर जातो याचे अवलोकन सुद्धा प्रत्येक पालकाने करणे गरजेचे असून या तरुणांच्या व्यसनाधीनतेला वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी हे अत्यंत धोकादायक तसेच घातक असल्याचे कदम यांनी सांगितले. कार्यक्रमातील प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी उपस्थित युवा वर्गाला तसेच पालकांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील विद्यार्थी हे मेडिकल वरील स्टिक फास्ट, कप सिरप, फेविकॉल यांच्यासारख्या पदार्थाचा जे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे त्यांचा व्यसनासाठी वापर दिसत आहेत त्या अनुषंगाने सुजाण नागरिकांनी मेडिकल वरून युवक खरेदी करत असताना अशा प्रकारचे पदार्थ त्याला देणे टाळावे शक्य नसेल तर त्यांच्या पालकांसोबत संपर्क साधावा जेणेकरून शालेय जीवनातील विद्यार्थी त्यापासून दूर राहील याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी सदर संदेश देत स्थानिक बस स्थानक चौकामध्ये मोफत दुधाचे वाटप करण्यात आले होते. याला प्रचंड प्रतिसाद लाभला असून अनेक पालकांनी तसेच युवा वर्गांनी यामध्ये सहभाग घेत आपण सुद्धा व्यसनापासून दूर राहिले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय याप्रसंगी या ठिकाणी केला. कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा युवकांना तसेच नागरिकांना व्यसनाधीनतेपासून कशाप्रकारे परावृत्त करायचे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आधार व्यसनमुक्ती केंद्र दे राजा, पोलीस उपविभाग, देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, देऊळगाव राजा पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी, आधार व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर विलास कोल्हे, डॉक्टर सौ काजल कोल्हे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, सचिव सुरज गुप्ता, उपाध्यक्ष मंगेश तिडके, डॉक्टर शिवाजी वाघ, अशोक जोशी, प्रभाकर मांटे, डॉक्टर उमेश मुंडे, डॉक्टर अमोल कोल्हे, डॉक्टर सुनील कायंदे, डॉक्टर कार्तिक कोल्हे , डॉक्टर नितीन मुंडे,राजू खांडेभराड, किरण वाघ, उषा डोंगरे, मुन्ना ठाकूर,मुबारक शहा, अमोल हरणे, संतोष वासुंबे, परमेश्वर खांडेभराड, दत्ता हांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.



