ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा जनजाती गौरव यात्रा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या वतीने थोर आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव यात्रेचे आयोजन समर्थ कृषी महाविद्यालयात करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सहसंघटन मंत्री मनोज साबळे विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत यांनी विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा यांचे विचार व संदेश सांगत त्यांच्या राष्ट्रभक्ती, सामाजिक जागृती व जनजाती समाजाच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात भगवान बिरसा मुंडा यांनी जनजाती समाजामध्ये नवचैतन्य, स्वावलंबन व आत्मअनुभूती जागवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाप्रसंगी भगवान बिरसा मुंडा यांच्या कलशाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरज चौधरी यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयो अधिकारी प्रा. योगेश चगदळे यांनी केले.

या कार्यक्रमास प्रा. अरूण शेळके, प्रा. विकास म्हस्के, प्रा. सचिन सोळंकी तसेच इतर शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे विद्यार्थी परिषदेचे अश्विन शिंदे, आर्या पातखेडे व विवेक माने कार्यक्रमास उपस्थित होते.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव व जनजाती समाजाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख निर्माण करणारा ठरला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये