ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदानाची टक्केवारी वाढविण्यास स्वीप अभियान

स्वाक्षरी मोहीम सुरु

चांदा ब्लास्ट

स्वीप (सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) अंतर्गत मतदान जनजागृती अभियान चंद्रपूर शहरात राबविले जात असुन यासाठी स्वाक्षरी अभियानाची सुरवात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी,मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या हस्ते जनता महाविद्यालय येथील कार्यक्रमात करण्यात आले.

  आगामी चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असून यासाठी सर्वांनी जनजागृती करण्याचे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.त्याचप्रमाणे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व आयुक्त कुनुरी नरेश यांनी याप्रसंगी केले.

   चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात स्वीप अभियान राबविले जात आहे. १ जानेवारी रोजी जनता महाविद्यालयात स्वाक्षरी अभियान, पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. तसेच याप्रसंगी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.

  कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतवणे, महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये