ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री करणार माता महाकालींच्या आशीर्वादाने चंद्रपूर महानगरपालिका प्रचाराचा शुभारंभ 

आ. जोरगेवार यांनी भेट घेत दिले निमंत्रण

चांदा ब्लास्ट

आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आराध्य दैवत श्री माता महाकाली यांच्या पावन दर्शन व आशीर्वादाने व्हावी, अशी आग्रहपूर्ण विनंती आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केली आहे. आज मुंबई येथील वर्षा बंगल्यावर झालेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी सदर विनंती केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरला येण्यास मान्यता दिल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले आहे.

चंद्रपूर ही माता महाकालींच्या कृपेने नटलेली भूमी असून, येथील जनतेची श्रद्धा आणि विकासाचा संकल्प यांची सांगड घालत प्रचाराचा प्रारंभ देवीच्या आशीर्वादाने व्हावा, अशी भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडली. महानगरपालिका निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून शहराच्या भावी विकासाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे या प्रक्रियेची सुरुवात आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेने व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या या आग्रहपूर्ण विनंतीला मान्यता देत सकारात्मक प्रतिसाद दिला. माता महाकालींच्या आशीर्वादाने चंद्रपूरच्या विकासयात्रेला अधिक बळ मिळेल, तसेच शहरातील पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लवकरच मुख्यमंत्री यांच्या चंद्रपूर आगमनाची तारीख निश्चित होणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये