एक खिडकी कक्षाद्वारे ९४ परवानगी अर्ज मंजूर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : – आचारसंहिता लागु झाल्यानंतर लागणाऱ्या विविध परवानगीसाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षाद्वारे आतापर्यंत ९४ परवानगी अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी आचारसंहिता लागु झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांना, उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या, परवाने घ्यावे लागतात. या परवानग्या संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीत एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. १५ डिसेंबर पासुन आतापर्यंत परवानगीसाठी या कक्षास १३१ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ९४ अर्ज मंजूर करण्यात आले आहे, १४ अर्ज नामंजुर तर २३ अर्जांवर कार्यवाही सुरु आहे.
या कक्षाद्वारे प्रचार कार्यालय,रॅली,मेळावा,मिरवणुक,रोड शो, बॅनर,कट आऊट,पोस्टर्स,जाहीर सभा,कॉर्नर सभा,प्रचार वाहन इत्यादी विविध परवानग्या देण्यात येतात.परवानगी करीता लागणाऱ्या विविध कागदपत्रांची माहितीही या कक्षात देण्यात येते. अर्ज हा संबंधित राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवाराचे बाबतीत उमेदवाराचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार अर्ज करु शकतात.



