अट्टल घरफोडी करणारी टोळी जेरबंद
06 घरफोडीचे गुन्हे उघड 1 लाख 55 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गुन्ह्यांची हकीकत याप्रमाणे आहे कि,दिनांक 19.12.2025 रोजी फिर्यादी नामे रोहित विलासराव चंदनखेडे वय 25 वर्ष राहणार विजय लॉन्स जवळ सावंगी मेघे ता.जि. वर्धा यांनी पो. स्टे. येऊन तक्रार दिली कि फिर्यादी फिर्यादीची पत्नी व मुलगा दुपारी 2:30 वा च्या दरम्यान त्यांचे नवीन घराचे बांधकाम पाहण्या करिता प्लॉट वर गेले व 1 तास नी घरी परत आले असता फिर्यादीला त्यांचे राहते घराचा दरवाजा अर्धवट खुला दिसल्याने सामान अस्तव्यस्त व घराचे कुलूप बेडवर पडून दिसल्याने फिर्यादीने घरातील लोखंडी रॅक ची पाहणी केली असता लोखंडी रॅक मध्ये ठेवून असलेली सोन्याची 05 ग्रॅम वजनाची पोत कि. 24,000/- रु व नगदी 45,000/- रु दिसून न आल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून फिर्यादी पत्नी सह घराला कुलूप लावून घराचे बांधकाम पाहण्या करिता गेले असता त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घरच्या आत प्रवेश करून वरील नमूद वर्णनाचा 69,000/- रु चा मुद्देमाल चोरून नेल्याचे सांगितले वरून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सावंगी मेघे अप क्रमांक 960/2025 कलम ३०५(अ), ३३१ (3) बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमुद गुन्हा अज्ञात आरोपीतांनी केला असल्याने तो उघड होण्याकरीता स्था.गु.शा वर्धा हे समांतर तपास करीत घटणास्थळी भेट देवुन सदर चोरी संबधाने गोपनीय माहितीवरून माहीती वरून सादरची चोरी . घरपोडी करणारा गुन्हेगार विशाल राम गायकवाड रा .कैकाडी नगर नागपूर याने त्याचे साथीदारसह केल्याचे निष्पन्न झाल्या वरून त्याचा व त्याचे साथीदारांचा शोध घेणे कमी नागपूर येथे पथकासह रवाना होऊन त्याचा व त्याचे साथीदारांची माहिती मिळाली की विशाल गायकवाड त्याचे साथीदार बर्डी मार्केटमध्ये फिरत आहे. त्यावरून त्याला व त्याच्या साथीदाराला दोन वाहनासह ताब्यात घेण्यात आले . त्यांना त्याचे संपूर्ण नाव विचारले असता आरोपी क्रमांक 1) विशाल उर्फ बबलू राम गायकवाड वय 22 वर्ष २) आदित्य राम गायकवाड वय 20 वर्ष. दोन्ही राहणार कैकाडी नगर, मनीष नगर नागपूर ३) दोन विधी संघर्षित बालक यांना वर नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली . तसेच खालील नमूद पोलीस स्टेशन मध्ये घरफोडी केल्याचे कबुली दिली
1) पोलीस स्टेशन, देवळी,
2) पोलीस स्टेशन, वर्धा शहर
3) पोलीस स्टेशन सेवाग्राम
4 ) पोलीस स्टेशन वरोरा जिल्हा चंद्रपूर
5) पोलीस स्टेशन बुटीबोरी जिल्हा नागपूर
वरील नमूद आरोपीतांकडून कडून 6 घरफोडीचे गुन्हे उघड करून 1,55,000/-रुपये चा माल दोन पंचा समक्ष जप्त करून आरोपीताण पो स्टे. सावंगी मेघे यांच्या ताब्यात पुढील तपास कामी देण्यात आले
सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक , मा. सौरभकुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो उप नि प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे. मनोज धात्रक, हमीद शेख,महादेव सानप, विकास मुंढे, सुगम चौधरी, विनोद कापसे,शुभम राउत, मंगेश आदे सायबर सेल चे पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, अनुप कावळे, अंकित जिभे यांनी केली.



