ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती तर्फे ग्राहक दिन साजरा

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात ग्राहक संरक्षण कायद्यावर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात “ग्राहक संरक्षण कायदा” या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अपर्णा धोटे तसेच प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती येथील तालुका निरीक्षण अधिकारी, वसंत वर्हाटे, जिल्हा संघटक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर,पुरुषोत्तम मते, हर्षा दुबे अधिकारी तहसील कार्यालय भद्रावती, श्री चौरसिया अभियंता एमएसईबी भद्रावती, श्री.ढवस, तसेच राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी, डॉ. कुलदिप भोंगळे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलाने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश डॉ. किरण जुमडे यांनी समजून सांगितला

याप्रसंगी मार्गदर्शक वसंत वर्हाटे यांनी ग्राहक चळवळ ते ग्राहक संरक्षण कायद्यापर्यंतचा इतिहास सांगितला त्यात ग्राहक चळवळ ची सुरुवात ते ग्राहक पंचायत स्थापनेपर्यंतचा प्रवास तसेच ग्राहक पंचायत चे अधिकार व ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली.

हर्षा दुबे यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ आणि २०१९ मधील फरक, ग्राहकांचे अधिकार तसेच ई- कॉमर्स आणि डिजीट ट्रेड याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच ग्राहक पंचायती द्वारे तयार करण्यात आलेल्या कायद्यामुळे आपली फसवणुकीपासून संरक्षण होते असे आपले मत व्यक्त केले.

श्री चौरसिया यांनी सौर ऊर्जेचे फायदे त्याबरोबरच त्याच्याशी निगडित असणाऱ्या सौर ऊर्जेच्या पॅनलला घरी लावण्याच्या आवेदना पासून ते विज निर्मिती पर्यंतचा सर्व गोष्टींना मुद्देसूत समजावून सांगितले

तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अपर्णा धोटे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे विद्यार्थ्यांनी अवलोकन करून कोणतीही आपली फसवणूक होण्यापासून संरक्षण करावे असे आवाहन केले.

 या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन डॉ कुलदिप भोंगळे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक डॉ. शशिकांत सीत्रे व डॉ. राजेश हजारे श्री शरद भावरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

 या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, भद्रावतीतील नागरिक,महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये