दिग्रस बुद्रुक येथे ग्राम कृषी विकास समितीची सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मौजे दिग्रस बुद्रुक तालुका देऊळगावराजा येथे दिनांक 31डिसेंबर ला ग्रामपंचायत कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत ग्राम कृषी विकास समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये गावातील विविध घटकांतर्गत आलेल्या 39 अर्जांचे वाचन करून अर्जांना समितीची मंजुरात देण्यात आली.
यावेळी दिग्रस बुद्रुक चे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अमोल डुकरे पाटील यांनी उपस्थित शेतकरी व समितीचे पदाधिकारी यांना प्रकल्पा अंतर्गत सध्या चालू असलेल्या सर्व घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक घटकासाठी असलेले निकष व पात्रता व अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सोबतच समूह सहायक श्री.सुयोग घुगे यांनी महाविस्तार येआय (Mahavistar AI) ॲप बद्दल माहिती दिली. ॲपच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन,कीड रोग ओळख, सल्ला सेवा यांचा कसा वापर करता येतो.
याबद्दल प्रत्यक्ष डेमोस्ट्रेशन करून दाखवण्यात आले. व शेतकऱ्यांना अँप डाउनलोड करून देण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी गावचे सरपंच उपसरपंच कृषी ताई ग्राम कृषी विकास समितीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
सभेमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्याने प्रकल्पात सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.



