ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- नुकताच राष्ट्रीय ग्राहक दिन तहसील कार्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जमदाडे, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रूपाली मोगरकर, नायब तहसीलदार कानकाटे, पुरवठा निरीक्षक प्रशांत वासनिक, तसेच तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघ अध्यक्ष गेडाम व ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा चंद्रकांत घोडके,तालुकाध्यक्ष नामदेव मोरताटे, सचिव दिगंबर आंबटकर,संघटक व इतर मान्यवर तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष अरुण जमदाडे यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व व सध्या होत असलेले सायबर क्राईम डिजिटल अरेस्ट याबाबत विस्तृत अशी माहिती दिली.



