24 वी आय.एस.के.एफ राष्ट्रीय कराटे प्रतियोगिता व ऑल इंडिया शोतो कप 2025 चे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
दि 27/12/2025 ते 28/12/2025 ला बल्लारपूर येथे श्रध्देय श्री.अटल बिहारी वाजपयी क्रिडा संकुल बल्लारपुर (विसापुर) 24 वी आय.एस.के.एफ राष्ट्रीय कराटे प्रतियोगिता व ऑल इंडिया शोतो कप 2025 चे आयोजन करण्यात आले होते ज्या मध्ये बिहार,कार्नाटका,अरुणाचल प्रदेश,आसाम, उत्तर प्रदेश,महाराष्ट्र या राज्यानी या प्रतियोगितेत सहभाग घेतला.
या प्रतियोगितेचे मुख्य आयोजक इंटरनेशनल शोतोकान कराटे फेडरेशन ऑफ इंडिया व प्रतियोगितेचे आयोजन आय एस के एफ महाराष्ट्र आणि शौर्य कराटे क्लब बल्लारपूर यांचे द्वारा संपुर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आले.
दोन दिवसाच्या कार्यक्रमा मध्ये प्रथम दिवस कराटे प्रशिक्षण व दुसऱ्या दिवशी कराटे प्रतियोगिता घेण्यात आली या प्रतियोगिते चे मुख्य अतिथि म्हणुन उदघाटन करिता नवनियुक्त सौ.अल्काताई अनिल वाढई अध्याक्षा नगर परिषद बल्लारपुर हयांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आय.एस.के.एफ इंडिया चे अरमेन हांसी शिव के. पांचाल ब्लैक बेल्ट 7 डान (USA),अध्यक्ष श्री.संजिव एस.कुबडे,,(महाराष्ट्र्) , सचिव श्री. भोईरबज्योती हजारीका (आसाम) ,उपाध्यक्ष श्री.अजय व.खोब्रागडे (महाराष्ट्र्) , सहसचिव श्री.बालु बालप्पा (कर्नाटक) ,कोषाध्यक्ष श्री.अमन कुमार (बिहार),सदस्य श्री.देबासिस साइकिया (अरुणाचल प्रदेश) ,श्री.सुदामा कुमार (उत्त्र प्रदेश) आणि प्रतियोगिते मुख्य रेफरी म्हणुन सेन्साई.योगेश चौव्हान (ए.के.एफ) ,श्री. प्रविण कुबड़े (महाराष्ट्र) यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले . द्विप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .मंचावर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमा च्या अंती मुख्य अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन बाहेरुन आलेल्या खेळाडु चे स्वागत केले व कराटे चे महत्व समजावुन मुलींना व महिलांना प्रशिक्षण घेणे आजच्या काळात किती गरजेचे असुन मुलाना शाळे मध्ये पण याचे धडे घेणे गरजेचे आहे ,असे त्यांनी सांगितले
या प्रतियोगिते मध्ये 200 पेक्षा अधिक खेडाळुनी भाग घेतले तसेच बाहेरुन आलेल्या राज्या मध्ये बिहार राज्य यांना प्रथम पुरस्कार ,कर्नाटक यांना द्वितिय स्थान व आसाम यांनी तृतिय स्थान घेऊन प्रतियोगीते मध्ये आपले स्थान कायम केले तसेच महाराष्ट्र्र राज्यातुन आलेले खेडाळु मध्ये प्रथम स्थान बल्लरपुर चे शौर्य कराटे क्लब , द्वितिय स्थान चंद्रपुर कराटे क्लब यांनी पटकावले व तृतिय स्थान वर गडचिरोली च्या कराटे पटुंनी बाजी मारली.
या कार्यक्रमाचे आयोजक श्री.विकास देशभ्रतार,संजय पारधी,अनिल संटिवार, सतिशबाबु अग्रवाल,कुणाल कुबडे,रोहीत राजभर,शिशिर प्रसाद,चैत्न्य कुबडे,सौ.एकता चुऱ्हे व शौर्य बहुउददेशिय संस्था सर्व पदाधिकारी यांचे द्वारा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडले . तसेच कार्यक्रमाला मोठया संख्ये मध्ये खेळाडुंचे पदक सत्कार करिता पाहुण्यांची उपस्थिती होती सौ.सुनिता जिवतोडे नगरसेविका बल्लारपुर , चंद्रपुर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन चे अध्यक्ष आवते सर, गुरुनानक कॉलेज बल्लारपुर चे प्रो.बोबडे सर, सामाजिक सेवक श्री.मास्टर आनंद ओड़वाल, श्री.राकेश वडस्कर , श्रीनिवास सर,खान सर , श्री.ओमप्रकाश प्रसाद, सोनु किरमे , सुरेंद्र खडका ,निवृत्त राजिव गांधी इंजि.कॉलेज चंद्रपुर चे प्रो.महेंद्र भोंगाडे , एङ श्री. रनंजयसिंह,एड. श्री. सुमित आमटे , माजी उपसरपंच विसापुर श्री.सुनिल रोगे,,प्रोजेक्ट ऑफिसर बॉटनिकल गार्डन विसापुर चे संचिन उमरे, श्री.घनश्याम बुरडकर,यांचे द्वारा करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये खेडाळुच्या पालकांनी मोठया संख्ये मध्ये उपस्थिती दर्शविण्यात आली आणि या प्रतियोगिते चे आयोजक यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे आभार व संचालन श्री.अजय व.खोब्रागडे यांनी केले.


